Skip links

Budget Laptops Launched:थॉमसन भारतीय बाजारात पहिल्यांदाच लॅपटॉप लॉन्च करत आहे. कंपनीने 8 लॅपटॉप लॉन्च केले आहेत जे इंटेल प्रोसेसरसह येतात. या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे.

टेक कंपनी थॉमसनने नवीन बजेट लॅपटॉप सीरीज लाँच केली आहे. हे लॅपटॉप केवळ फ्लिपकार्टवर विकले जातील. थॉमसन पहिल्यांदाच भारतीय बाजारपेठेत लॅपटॉप लाँच करत आहे. कंपनीने इंटेल प्रोसेसरने चालणारे आठ लॅपटॉप सादर केले आहेत. ज्यामध्ये Intel Celeron ते Intel Core i3, i5 आणि i7 12 जनरेशन प्रोसेसरचा समावेश आहे, कंपनी लवकरच 13व्या जनरेशनचे मॉडेल सादर करण्याचा विचार करत आहे. थॉमसनच्या नवीन लॅपटॉपची किंमत 14,990 रुपयांपासून सुरू होते. हा लॅपटॉप अभ्यास करणारे विद्यार्थी, दैनंदिन युजर्स आणि व्यावसायिकांसाठी सर्वोत्तम आहे